ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे श्रीनाथ जन्माष्टमी ता.५ डिसेंबर रोजी, मंगळवार ता.२८ पासून हरिनाम सप्ताह सुरुवात.


खरसुंडी प्रतिनिधी.
खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात जन्माष्टमीनिमित्त  अखंड हरीनाम सप्ताहास मंगळवार तारीख २८ रोजी सुरुवात होणार असून ही श्रीनाथ जन्माष्टमी सोहळा ता. ५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता होणार असल्याची माहिती श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.


ता. २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर अखेर होणाऱ्या या सोहळ्यात प्रामुख्याने श्री भैरवनाथ महात्म्य ग्रंथाचे पारायण, अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे .त्यामध्ये हरिपाठ, भजन, कीर्तन, भारुड, अन्नदान  या  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ता.५ रोजी रात्री साडेबारा वाजता श्रींचा जन्मोत्सव होणारा असून ता. ६ रोजी ग्रंथ दिंडी, मिरवणूक दहीहंडी, सोहळा होणार आहे. ज्या भाविकांना  भैरवनाथ महात्म्य ग्रंथ पारायणामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी श्रीनाथ देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post