ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथे आ.गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन व मन की बात कार्यक्रम

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे आ.गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन व मन की बात कार्यक्रम संपन्न.


खरसुंडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी पडळकर यांच्या हस्ते संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पाहण्यात आला.यावेळी खुर्चीची व्यवस्था असुनही आ.पडळकर यांनी सर्वसामान्य जनतेत खाली बसुन हा कार्यक्रम पाहणे पसंत केले.
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते आ.पडळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले, उपसरपंच राजाक्का कटरे, ग्रामपंचायत सदस्य,कानकात्रेवाडीचे सरपंच गजानन खरात व भाजपाचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.



Previous Post Next Post