आटपाडी प्रतिनिधी
२६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेक्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला होता .त्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते .हा हल्ला परतावून लावत असताना पोलीस व लष्करातील अनेकांनी आपले प्राण पणाला लावले होते .या अतुलनीय पराक्रमा प्रित्यर्थ प्रतिवर्षी दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मा. अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व सैनिक कल्याण निधीस मदत देण्यात येते .
यावर्षी हा निधी आटपाडी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व माजी सैनिक मोहनराव देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री पवार सर ,निरीक्षक श्री नामदास सर, विजयादेवी देशमुख बालविकास मंदिर चे मुख्याध्यापक खरात सर व विद्यार्थी उपस्थित होते