खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी तालुका आटपाडी येथे श्री नाथ जन्माष्टमी निमित्त मंगळवार ता. २८ पासून हरिनाम सप्ताह सुरुवात झाली आहे.त्यानिमीत्त मुख्य मंदिरात ग्रंथ पारायण, हरीपाठ,भजन, कीर्तन, अन्नदान असे कार्यक्रम सुरु आहेत.
दरम्यान सोनारी ते खरसुंडी पायी दिंडीचे ता.३१ रोजी सोनारीहून प्रस्थान झाले आहे.या दिंडीचे ता.५ रोजी खरसुंडीत आगमन होणार आहे.
आज ता.१ रोजी उज्जैन ते खरसुंडी भक्ती ज्योतीचे खरसुंडीतुन उज्जैनला प्रस्थान झाले.रविवार ता.३ रोजी ऊजैन येथे महांकालेश्वर व काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे.ता.४ रोजी ज्योत सोनारी येथे पोहचणार असुन ता.५ रोजी पहाटे ज्योतीचा सोनारी हुन दौडीने प्रारंभ होऊन म्हसवड मार्गे खरसुंडीत सायंकाळी मुख्य मंदिरात पोहचणार आहे.