आटपाडी प्रतिनिधी.
आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून ओळख असलेला व ५१ एकरामध्ये जॅग्वार सिटी हा प्रकल्प साकारला आहे .यामध्ये पहिल्या दीडशे प्लॉट खरेदीखत केलेल्या भाग्यवान ग्राहकांना घोषित केल्याप्रमाणे दुचाकी व चार चाकी गाड्यांचे वितरण करण्यात येणारआहे .त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून दीडशे अशा वर्कर्सना सायकल वाटप करण्यात येणार आह रविवार तारीख २१ रोजी सायंकाळी पाच वाजता प्रकल्प स्थळी खासदार संजय( काका) पाटील यांच्या हस्ते वाटप होणार असून या कार्यक्रमासाठी अभिनेते मिलिंद गुणाजी व पूजा सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवजल ग्रुप जॅग्वार सिटी आटपाडी यांनी केले आहे.