खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील शितलकुमार यशवंत पुजारी यांची MDRT 2024 साठी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. खरसुंडी गावामध्ये हा बहुमान मिळवणारे शितल पुजारी हे पहिलेच विमा प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत मध्ये सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य किरण पुजारी ,निलेश पोमधरणे,सुभाष माळी, विक्रम भिसे, सोसायटी संचालक एकनाथ भोसले,ग्रामस्थ अतुल पुजारी, चंद्रकांतपुजारी ,नंदकुमार माने .रघुनाथ शिंदे ,उत्तम इंगवले आधी उपस्थित होते.