आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात पौष पौर्णिमे निमीत्त पालखी सोहळा संपन्न झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की परंपरेनुसार पौष पौर्णिमेस श्री सिद्धनाथ काशी क्षेत्राकडे शिकारीसाठी प्रस्थान करतात व माघ पौर्णिमेस परत येतात अशी आख्यायिका आहे. त्यानुसार काल मुख्य मंदिरातून श्रींचे शिकारीसाठी प्रस्थान झाले. यावेळी रात्री नऊ वाजता मुख्य मंदिरातून पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात कडे आला व त्यानंतर मंदिरात परत आला. यावेळी अग्रभागी असणाऱ्या हलगी पथकांनी मुख्य पेठ दणाणून सोडली .सोहळ्यात सेवेकरी, मानकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .संयोजन श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.