ब्रेकिंग न्यूज

त्रैवार्षिक जकाई यात्रेसाठी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट कडून वेळापत्रक निश्चित.


खरसुंडी प्रतिनिधी
श्रीनाथ जकाई यात्रा २०२४ साठी खरसुंडी ता. आटपाडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टने वेळापत्रक जाहीर केले असून तारीख २३ रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
 ता. २३ रोजी सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखी रथाचे मुख्य मंदिरातून जकाई द-याकडे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता घोडेखुर, साडेदहा वाजता घुलेवाडी ,सव्वा अकरा वाजता धावडवाडी, दुपारी बारा वाजता आवटेवाडी नं.१, एक वाजता आवटेवाडी नं. २, दुपारी दोन वाजता नेलकरंजी, सायंकाळी साडेचार वाजता माळी वस्ती, मानेवाडी ,मेटकरवाडी. सायंकाळी सहा वाजता हिवतड, गुलालकी, मेटकरवाडी असा मार्ग असून रात्री साडेसात वाजता पालखी जकाई दऱ्यात भेटीसाठी जाईल. या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. ता. २४ रोजी सर्व धार्मिक विधी व नित्योपचार झाल्यानंतर पालखीचा दुपारी दोन वाजता खरसुंडीकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे.


Previous Post Next Post