आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी तालुका आटपाडी येथील खिलार जनावरांच्या प्रसिद्ध यात्रे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातून यात्रेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी दाखल झाले आहेत .
या यात्रेत सामाजिक बांधिलकी म्हणून खरसुंडी विकास सोसायटीच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री जयवंत शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. यावेळी चेअरमन जगदीश पुजारी, सरपंच धोंडीराम इंगवले, बाजार समिती संचालक शंकर भिसे, ग्रामपंचायत सदस्य शफिक तांबोळी, विक्रम भिसे राहुल गुरव जिल्हा बँकेचे अधिकारी हुमायुन शेख, आकाश पाटील, सोसायटी संचालक ताई पुजारी, विटा अर्बनचे संचालक बादशाह इनामदार, भारत भंडारे, मुरलीधर बाड,सचिव नंदकुमार निचळ संस्थेची कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.