ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी पौष यात्रेची पशुप्रदर्शनाने सांगता.


खरसुंडी ता. आटपाडी येथील खिलार जनावरांच्या पौष यात्रेची सांगता जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनाने  झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या वतीने आयोजित पशुप्रदर्शनात जातीवंत दोनशे हून अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील मैदान जातिवंत खिलार जनावरे व हलगीच्या निनादाने दुमदुमून गेले. प्रदर्शनाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व गो पूजन करून झाले. प्रदर्शनामध्ये गटनिहाय विजेते स्पर्धक अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
वर्षाच्या आतील खोंड-बाळकृष्ण दयानंद कांबळे, यश बाळासो पाटील, विपुल जाधव
वर्षावरील खोंड-विजय बापूराव निकम, विजय बापूराव निकम ,धनंजय सिताराम पुजारी व संस्कार सिद्धेश्वर कांबळे,( विभागुण)
दुसा खोंड- समाधान बिरा सरगर ,मोहन बापू चोरमले ,आप्पा सुखदेव थोरात .
चौसा खोंड- गुलाब काळेबाग, सुमित मोहन चोरमले ,
सहादाती खोंड- त्रिशा राजू कटरे ,बबलू पाखरे, बबलू पाखरे. 
जुळूक बैल- विजय बापूराव निकम, बिरा पांडुरंग सरगर ,सुखदेव श्रीपती थोरात.
वर्षा आतील कालवड - संग्राम भोसले, नंदकुमार शिवाजी येलपले ,उत्तम मयाजी सरगर ,
वर्षावरील कालवड- रावसाहेब चंद्रभान सरगर, श्रीकांत भाऊ सरगर, नाना नाथा इंगवले 
,दुसी कालवड -सुभाष पवार ,शिवाजी विश्वनाथ जाधव, रमेश पांडुरंग तनपुरे. 
चौसी कालवड -किरण मासाळ ,मायाप्पा धोंडीराम थोरात .
सहादाती कालवड -भानुदास जाधव ,निळकंठ नारायण ढगे, सौरभ जगन्नाथ पुजारी, 
जुळूक गाय -सिद्धेश्वर लक्ष्मण गुरव ,तानाजी नाना इंगवले, रोहन हनुमंत गळवे.
सर्व विजेत्या स्पर्धकांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भैय्या भोसले व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून जिल्ह्यातून आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम पाहिले.
बाजार समिती व ग्रामपंचायतने घेतलेल्या प्रदर्शनाची अवस्था वरातीमागून घोडे अशी झाली आज पूर्ण यात्रा संपल्यानंतर आयोजित प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना हेलपाटा मारावा लागला .तसेच प्रेक्षक म्हणून केवळ स्थानिकांचा सहभाग होता त्यामुळे यापुढे प्रदर्शन पौष वद्य  तृतीया (पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी )बाजार तळावरच घेण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

यावेळी यात्रेच्या यशस्वी नियोजना बद्दल बाजार समितीच्या पदाधिकारयांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सभापती संतोष पुजारी ,उपसभापती राहुल गायकवाड, सरपंच धोंडीराम इंगवले ,उपसरपंच राजाक्का कटरे, डी .के .देसाई कंपनीचे दिपेन देसाई ,यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, ग्रामपंचायत  सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ,मान्यवर व ग्रामस्थ तसेच  ग्रामसेवक पवन राऊत ,बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद पुजारी यांनी केले.



Previous Post Next Post