ब्रेकिंग न्यूज

विशाल पाटील यांचा आटपाडी पश्चिम भागात संपर्क दौरा


आटपाडी प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात आज संपर्क दौरा केला .यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, नगरसेवक मनोज दादा सरगर, डी. एम .पाटील सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी पाटील यांनी मानेवाडी येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर नेलकरंजी,कानकात्रेवाडी, तनपुरवाडी, घुलेवाडी ,आवटेवाडी धावडवाडी या गावांत संवाद साधल्यानंतर त्यांचे खरसुंडी येथे आगमन झाले. त्या ठिकाणी त्यांनी  कुलस्वामी श्री सिद्धनाथ मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर मिटकी ,वलवण, घाणंद, कामथ, जांभुळणी ,घरनिंकी ,पिंपरी बुद्रुक परळकरवाडी, झरे ,कुरुंदवाडी, गुळेवाडी या गावात संपर्क दौरा केला.
यावेळी त्यांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी शेती ,सिंचन ,उद्योग ,दळणवळण याबाबत अनेक समस्या नागरिकांनी त्यांना सांगितल्या. या सर्व समस्या ऐकल्यानंतर त्यांनी सध्याचे सरकार फक्त घोषणा व जाहिरातीवर अवलंबून असून स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने आगामी निवडणुकीत बदल करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री पाटील यांचा ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला. दौऱ्यावेळी औटवाडीचे सरपंच किरण पवार, सचिन गुरव राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष जालिंदर कटरे यांच्यासह विविध गावातील मान्यवर उपस्थित होते.
      
संपर्क दौऱ्यादरम्यान विशाल पाटील यांचे शिवसेना तसेच भाजपच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत व सत्कार केला.

आटपाडी पश्चिम भागात संपर्क दौ-या दरम्यान विशाल पाटील.

Previous Post Next Post