मिटकी ता.आटपाडी येथील निवास जगन्नाथ कोळपे यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे.नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी विभागासाठीच्या परीक्षेत निवास यांनी एन.टी.प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.आटपाडी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन जगन्नाथ कोळपे यांचे ते चिरंजीव आहेत.त्यांचा या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
निवास जगन्नाथ कोळपे यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड
Admin
0