आटपाडी प्रतिनिधी
आटपाडीचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 25 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या सूचनेनुसार माजी जि प सदस्य अरुण बालटे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आला. कार्यक्रमास माजी जि प सदस्य अरुण बालटे .बाजार समितीचे संचालक अजय कुमार भिंगे, दिलीप माळी, माजी उपसरपंच विलास नांगरे पाटील, बाबासाहेब माळी, संजय भिंगे ,संभाजी काका देशमुख, रमेश भिंगे ,पांडुरंग देशमुख, बी. डी. पाटील. सर जालिंदर पाटील सर, नितीन कुलकर्णी, बजरंग फडतरे, राजेंद्र माळी ,दिलीप लिगाडे, शशिकांत सागर, दत्तात्रय स्वामी, सोमनाथ भिंगे, स्नेहजीत पोतदार, प्रसाद भिंगे, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.