आटपाडी प्रतिनिधी
राजेवाडी या.आटपाडी येथील श्री श्री रविशंकर कारखान्यावर विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शेतकरी व कार्यकर्ते कारखाना स्थळावर दाखल झाले. याठिकाणी प्रवेश करताना आंदोलक व पोलिसांत मोठी झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांनी गाव्कहाणीडे जाऊन उसाची वाहने रोखली, त्यामुळे कारखान्याची गाळप काही काळ थांबले. यावेळी आंदोलकांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी राजेवाडी कारखान्याने जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या बरोबरीने दर द्यावा, आटपाडी तालुक्यातील ऊस अग्रक्रमाने तोडावा, दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा अशा मागण्याचा आग्रह धरला. यावेळी आंदोलन व कारखाना प्रशासनामध्ये चर्चा झाल्यानंतर येथून पुढील गाळप ऊसाला प्रति टन 100 रुपये व मागील गाळप ऊसाला प्रति टन 50 रुपये जादा दर देण्याचे मान्य केले .याबाबतचे लेखी पत्र प्रशासन अधिकारी उदय जाधव यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष विजय माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, मनसेचे प्रकाश गायकवाड ,ऋषिकेश साळुंखे , अजित बोरकर ,अजित कोडग, शहाजन शेख, ईश्वर माने, तानाजी सागर ,नंदकुमार माने , केशव शिरकांडे, कृष्णा पुजारी, राजेंद्र पाटील, बाबुराव शिंदे, अमित दबडे ,तानाजी पारेकर, सुरेश वडुले ,शिवराज गायकवाड, मदन जाधव सिराज तांबोळी, संदीप शिरोटे ,सुरेश पाचिब्रे, सय्यद मुलाणी ,संजय यादव आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाभिमानाच्या आजच्या लढ्याला यश आले आहे. कारखान्याने वाढीव ऊस दराची रक्कम वर्ग न केल्यास पुन्हा आंदोलन करू.
महेश खराडे
जिल्हाध्यक्ष ,स्वाभिमानी संघटना