खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे स्वर्गीय आ. अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ,उद्घाटन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या शुभहस्ते होणार आहे .या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील असणार आहेत.
खरसुंडी येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून १ कोटी ६५ लाख खर्चाच्या जि प शाळा नंबर १ व २ इमारतीचे भूमिपूजन तसेच महादेव मंदिर ते सिद्धनाथ मंदिर या मार्गावरील १७ लाख २५ हजार खर्चाच्या पेव्हींग ब्लॉक कामाचे व जानकर वस्ती येथील स्मशानभूमी शेडचे लोकार्पण त्याचबरोबर खरसुंडी ते कामथ रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील उपस्थित असणार आहेत
कार्यक्रमासाठी सरपंच धोंडीराम इंगवले उपसरपंच राजाक्का कटरे,देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, माजी सरपंच अर्जुन सावकार, विश्वस्त विजयकुमार भांगे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असणार आहेत. जि .प .शाळा. नंबर १ व २ या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.