आटपाडी प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आटपाडीत सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सहकार भारती व चौडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .त्यानंतर उपस्थित महिलांचे हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सुधीर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महिलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात सहकार भारतीचे सतिश भिंगे, दत्तात्रय स्वामी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक सुधीर देशमुख ,पतसंस्था तालुका अध्यक्ष बाबासाहेब माळी, उपाध्यक्ष चंद्रकांत दौंडे ,व्हाईस चेअरमन योगेश रणदिवे, सचिव बालक डोईफोडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात सहकार भारतीचे कामकाज, पतसंस्थांची वसुली, महिला कर्मचारी प्रशिक्षण याबाबत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन दत्तात्रय स्वामी यांनी तर आभार तुकाराम जाधव यांनी व्यक्त केले.