ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाला सहकार्य करा तहसीलदार सागर ढवळे

खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाला सहकार्य करा असे अवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी व्यक्त केले. ता.५ मे रोजी होणाऱ्या सासणकाठी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात झालेल्या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील ,पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड ,गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या सह विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी सरपंच धोंडीराम इंगवले यांनी प्रास्तावित व स्वागत केले. त्यानंतर तहसीलदार सागर ढवळे यांनी यात्रेशी संबंधित आरोग्य, वीज, ग्रामपंचायत, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, देवस्थान ,परिवहन महामंडळ, बाजार समिती, पोलीस व महसूल विभागांनी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या तयारीचा आढावा घेऊन जबाबदारी निश्चित केली. यावेळी मंदिरातील दर्शन व्यवस्था, पार्किंग, सीसीटीव्ही, पर्यायी रस्ते याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस सहाय्यक अभियंता विष्णू मंडले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कोळेकर, आगार व्यवस्थापक श्री राहुल देशमुख, डॉ.पी.व्ही. मिसाळ, कनिष्ठ अभियंता अनासो बुरुंगले व बी एस जोजन, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी ,उपसभापती राहुल गायकवाड ,संचालक सुबराव पाटील, शंकर भिसे, सचिव एस. यु. जाधव देवस्थान समितीचे सदस्य भरत पाटील, पद्माकर पाटील, नंदकुमार भुडकर ,महादेव सावकार ,सचिव अरुण उपाध्ये .ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, किरण पुजारी, माजी उपसरपंच दिलीप सवणे, मंडल अधिकारी के.बी .मुलांनी. तलाठी के. एस .मुंडे ,पोलीस पाटील बापूराव इंगवले, ग्रामसेवक सोमनाथ शिंत्रे ,सुरेश इंडीयनचे दत्तात्रय चव्हाण ,यांच्यासह ग्रामस्थ व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर मानकरी यांच्या उपस्थितीत आणि विविध खात्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन बैठका आयोजित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सागर ढवळे यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी यात्रेतील वाहतूक व पालखी मिरवणूक याबाबत उपयुक्त सूचना करून यात्रेसाठी सहकार्य करण्याचे अवाहन केले .आभार ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी व्यक्त केले.

खरसुंडी येथे चैत्र यात्रेच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठक.

   
           जनावरांची यात्रा झरे रोडला
 चैत्र  यात्रेच्या निमित्ताने भरणारया खिलार जनावरांच्या बाजार तळा बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बाजार समितीने भिवघाट रस्त्याकडील तळाला तर ग्रामपंचायत प्रशासनाने झरे रस्त्याकडील  तळावर बाजार भरवण्याबाबत आग्रह धरला. यावर तहसीलदार सागर ढवळे यांनी अधिकृत बाजारतळ प्रशासनाकडून जाहीर होईपर्यंत यात्रा गत वर्षीप्रमाणे झरे रोडवरील बाजार तळावर भरवण्याचा तोडगा काढला.
Previous Post Next Post