ब्रेकिंग न्यूज

रुद्रपशुपती कोळेकर महाराज मठ कोळे यांच्या वतीने कोळे ते शिखर शिंगणापूर दिंडी सोहळ्याचे आयोजन,सोमवार ता.१५ रोजी प्रस्थान

श्री श्री 1008 रुद्रपशुपती कोळेकर महाराज मठ संस्थान निमसोड ,गुरुगादी कोळे यांच्या वतीने कोळे ते शिखर शिंगणापूर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . सोमवार ता. 15 रोजी कोळे ता. सांगोला येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. ता. 15 रोजी दिंडीचा आटपाडी येथे मुक्काम असून ता.16 रोजी राजेवाडी येथे तर ता.17 रोजी मार्डी येथे मुक्काम असणार आहे. ता. 18 रोजी दिंडीचे शिखर शिंगणापूर येथे आगमन व मुक्काम होणार आहे .ता. 18 ते 20 दरम्यान दिंडीचा शिंगणापूर येथील मठात मुक्काम असून त्या ठिकाणी परमरहस्य ग्रंथाचे पारायण , किर्तन, हरिपाठ व भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .ता. 20 रोजी परमरहस्य ग्रंथाची समाप्ती व रुद्रपशुपती कोळेकर महाराजांचे कीर्तन होणार आहे.
या दिंडी सोहळ्यात हिंगणगाव ,हातीद, नाझरे, केमवाडी येथील दिंड्या सहभागी होणार आहेत .दिंडी सोहळ्याचे 32 वे वर्ष असून दिंडी मार्गावर ठीकठीकाणी भाविकांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.


Previous Post Next Post