खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील सिद्धनाथ चैत्र यात्रेच्या यशस्वीतेसाठी शासन यंत्रणांनी समन्वयांने काम करावे असे आवाहन प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी केले.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर ,सरपंच धोंडीराम इंगवले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी व विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी प्रांताधिकारी यांनी दिनांक १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाबाबतच्या पूर्ततेचा आढावा घेतला. त्यामध्ये ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, एस.टी. महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य विभाग ,पोलीस या खात्यांनी चैत्र यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.त्यामधील अपूर्ण कामांची त्वरित कार्यवाही करून पूर्तता अहवाल सादर करण्याची सूचना प्रांताधिकारी यांनी दिली. यात्रेमध्ये प्रामुख्याने पोलीस, आरोग्य, देवस्थान, ग्रामपंचायत यासह अन्य शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम केल्यास यात्रा सुरळीत पार पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा प्रांताधिकारी यांनी व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच राजाक्का कटरे ,पोलीस पाटील बापूराव इंगवले, तलाठी एस के मुंढे, मंडल अधिकारी कमाल मुलाणी,ग्रामसेवक पवन राऊत, देवस्थान विश्वस्त विजयकुमार भांगे ,शेखर निचळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, पोलीस कर्मचारी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते .
बैठकीस अन्न व औषध प्रशासन तसेच उत्पादन शुल्क खात्यांचच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन वेळा दांडी मारल्याने संबंधित खात्यांचा आढावा होऊ शकला नाही .
खरसुंडी चैत्र यात्रा परंपरेनुसार पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी. मुख्यत: जनावरांच्या बाजारात आवश्यक दक्षता घ्यावी
प्रांताधिकारी विक्रम बांदल