खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत ता.५ मे रोजी होणाऱ्या सासणकाठी स सोहळ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ता. ५ मे रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक खरसुंडी दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने विविध पातळीवर जय्यत तयारी केली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेमध्ये मुबलक पाणी पुरवठ्याची नियोजन करण्यात आले आहे .वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थानिक पाणीपुरवठा विहिरीवर प्रथमच भगीरथ योजनेअंतर्गत नवीन ट्रान्सफॉर्मर जोडण्यात आला आहे .त्यामुळे त्या ठिकाणी अडचणी दूर होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर भाविकांच्या वतीने देण्यात आलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त आलेल्या स्थानिक व फिरत्या व्यापारयांना जागावाटप करण्यात आले आहे. ता. ५ मे साठी वाहणतळाचे नियोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी साफसफाई ,मंडप ,पिण्याचे पाणी, ध्वनीक्षेपक , स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात आली आहे .त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक दक्षता घेण्यात आली आहे .यात्रा परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही व विजेची सोय करण्यात आली आहे.
खरसुंडी ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक विहिरीवर नवीन ट्रान्सफॉर्मर जोडून पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. |
खरसुंडी चैत्र यात्रेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
धोंडीराम इंगवले.
लोकनियुक्त सरपंच, खरसुंडी.