आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे विटा -माडगुळे जिल्हा मार्गावर खरसुंडी नजीक पाईप व आर.सी.सी. गटर्स रु ८० लाख,तसेच झरे ते नेलकरंजी पासून राज्यमार्ग क्र १५१ला मिळणारया रस्त्यावर आर.सी.सी.गटर्स.रु१कोटी या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले, उपसरपंच राजाक्का कटरे,उमाजी सरगर, बाळासाहेब सरगर,भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग,संजय कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, ग्रामसेवक पवन राऊत व ग्रामस्थ,भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.