आटपाडी प्रतिनिधी
कोळे ता. सांगोला येथील रुद्रपशुपती मठाचे ३०वे मठाधिपती कोळेकर महाराज काल ता .१३ रोजी सकाळी शिवैक्य झाले होते. सायंकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव कोळे येथे आणण्यात आले. रुद्रपशुपती चौकात उपस्थित भाविकांनी पुष्पांजली करून त्यांना श्रद्धांजली वाहिली .
त्यानंतर मठामध्ये अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली होती. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत लाखो भाविकांनी महाराजांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी अखंड हरिनाम व भजन सेवा सुरू ठेवण्यात आली होती .
आज पहाटेपासून महाराष्ट्र व कर्नाटकातील भक्तगणांचा कोळेनगरी कडे ओघ सुरू होता. अंत्यदर्शनासाठी मठाच्या बाहेर लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर ठीक ठीकाणच्या शिवाचार्यांनी मठांमध्ये येऊन कोळेकर महाराजांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी तीन वाजता काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे मठामध्ये आगमन झाले त्यांच्या हस्ते व शिवाचार्यांच्या उपस्थितीत कोळेकर महाराजांना महाअभिषेक झाल्यानंतर समाधी विधी सुरुवात करण्यात आली. समाधी स्थळाजवळ पार्थिव आल्यानंतर उपस्थित भाविकांनी कोळेकर महाराजांच्या जयजयकार करत पुष्पवृष्टी केली. त्यानंतर कोळी मठाचे ३१ वे पिठाधीपती जन्मेनजय महाराज यांच्या हस्ते मठामध्ये भस्म समाधी देण्यात आली .
कोळेकर महाराजांच्या निधनामुळे कोळे गावातील सर्व व्यवहार कालपासून पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मात्र बाहेरून आलेल्या भाविकांसाठी चहा, बिस्किट व प्रसादाची सोय मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती.यावेळी कोळेकर महाराजांच्या आठवणीने अनेकांचा कंठ दाटुन आला.उपस्थित शिवाचार्यांनी महाराजांच्या आठवणी व धर्मकार्याची महती सांगून आदरांजली वाहिली.
यावेळी हिंगणगाव, बेळंकी, म्हासोली, म्हैसाळ ,धारेश्वर, वाईकर ,बार्शीकर, नागणसूर, शिंगणापूर ,मोडकर, दहिवडीकर, वाळवेकर, मानुरकर येथील शिवाचार्य तसेच महाराजांचा शिष्यगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता .
यावेळी चिदानंद स्वामी सोलापूर यांच्या अधिपत्याखाली चंद्रकांत स्वामी कोळे व अन्य स्वामींनी धार्मिक विधी केले .मंगळवार ता. २५ रोजी महाराजांचे समाधीस महाभिषेक होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन कोळे ग्रामस्थ, भक्तगण, व रुद्रपशुपती मठाच्या वतीने करण्यात आले होते.
कोळे ता.सांगोला येथे रूद्रपशुपती कोळेकर महाराजांच्या भस्मसमाधी प्रसंगी आशीर्वचन देताना श्रीमद् जगद्गुरु डॉ.मलिकार्जुन शिवाचार्य महास्वामी. |
रुद्रपशुपती मठाचे वैभव व परंपरा टिकवण्यासाठी नूतन शिवाचार्य व सर्वांनी प्रयत्न करावे, काशी पिठाचे आपणास आशीर्वाद राहतील.रूद्रपशुपती कोळेकर महाराज यांचा भस्म समाधी विधी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
डॉ .मल्लिकार्जुन शिवाचार्य
श्रीमद जगद्गुरु काशीपीठ
https://youtube.com/live/fo84BaI0YE4?feature=share