खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे बस स्थानक परिसरात तीन ठिकाणी काल रात्री चोरीची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरात सिध्देश्वर तरंगे यांचे हार्डवेअर दुकान,सुरज गायकवाड यांच्या मालकीचे सराफी दुकान व जावीर यांची पानपट्टी अशी तीन दुकाने फोडण्यात आली आहेत.हार्डवेअर व पानपट्टी दुकानातुन रोख रक्कम तर सराफी दुकानातुन चांदी चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खरसुंडी येथे वारंवार अशा घटना घडत आहेत. मात्र गावात सी.सी.टी.व्ही.यंत्रणा नसल्याने पोलिस यंत्रणे पुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
घटनास्थळी आटपाडी पोलिस दाखल झाले असुन तपास सुरू आहे.