ब्रेकिंग न्यूज

शहीद विष्णू पुकळे यांच्या स्मृतिदिना निमित्त उद्या मंगळवार ता. 13 रोजी बनपुरी येथे विविध कार्यक्रम.


शहीद जवान विष्णू पुकळे

आटपाडी प्रतिनिधी 
बनपुरी ता. आटपाडी येथील सुपुत्र शहीद विष्णू पुकळे यांच्या 21व्या स्मृतिदिना निमित्त त्यांचे स्मारक स्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
सकाळी आठ वाजता मुख्य चौकात शहीद विष्णू पुकळे यांच्या नाम फलकाचे उद्घाटन होणार आहे. तद्नंतर आटपाडी कॉलेज आटपाडी येथील एन.सी.सी. छात्र सलामी देणार आहेत. सकाळी नऊ ते अकरा पर्यंत प्रभात फेरी, रक्तदान शिबिर उद्घाटन ,गुणवंत विद्यार्थी सत्कार ,मनोगत, भजन असे कार्यक्रम होणार असून दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होणार आहे. दुपारी एक वाजता कवी संमेलन होणार असून सायंकाळी चिंतन बैठक व गीत गायन होणार आहे .

सर्व कार्यक्रमांचे संयोजन शहीद जवान विष्णू पुकळे फौंडेशन, ग्रामपंचायत, सोसायटी व बनपुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post