ब्रेकिंग न्यूज

शहीद विष्णू पुकळे यांना 21व्या स्मृतिदिना निमित्त बनपुरी येथे विविध उपक्रमांनी आदरांजली.


आटपाडी प्रतिनिधी 
बनपुरी ता.आटपाडी येथील सुपुत्र शहीद जवान विष्णू पुकळे यांना 21व्या स्मृतिदिना निमित्त विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. आज सकाळी बनपुरी येथील मुख्य चौकात शहीद विष्णू पुकळे यांच्या नाव फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन एन.सी.सी.च्या छात्रांनी मानवंदना दिली. त्यानंतर प्रभात फेरी व प्रतिमा पूजन करण्यात आले .त्याचबरोबर विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला .
बनपुरी  - खरसुंडी रस्त्यावरील त्यांच्या समाधी स्थळावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता वीर पिता सुखदेव पुकळे यांच्या हस्ते समाधी पूजन करण्यात आले त्यानंतर मंत्राच्या व अमर रहेच्या  जयघोषात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांनी शहीद पुतळे  यांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील ,माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष जयदीप भोसले,भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात ,भारत तात्या पाटील ,गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर ,आटपाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. दिवसभरामध्ये रक्तदान शिबिर, चिंतन बैठक, कवी संमेलन ,गीत गायन असे उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमस्थळी सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती .संयोजन शहीद विष्णू पुकळे फौंडेशन  व ग्रामस्थांनी केले होते.

शहीद जवान विष्णू पुकळे यांच्या स्मृतिदिना निमित्त बनपुरी येथील समाधी स्थळावर आदरांजली वाहण्यात आली.



Previous Post Next Post