खरसुंडी प्रतिनिधी
खासदार विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भैया भोसले प्रमुख उपस्थित होते .
यावेळी जि प शाळा नंबर दोन व कृष्णा रामा गुरव आश्रम शाळेत मुलांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले .तसेच शाळेच्या आवारात लावण्यासाठी वृक्ष भेट देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांच्यासह युवानुते सचिन गुरव, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, शिवसेना तालुकाध्यक्ष शेखर निचळ, सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी ,ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी जोगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक किशोर पुजारी, जहांगीर शेख, दिलीप साळुंखे ,बाळासो केंगार दिलीप पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.