ब्रेकिंग न्यूज

आटपाडी येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ. श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स अकॅडमी चा उपक्रम

आटपाडी प्रतिनिधी 
आटपाडी तालुक्यातील युवकांना तंत्रशुद्ध क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील युवकांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आटपाडीत सुसज्ज क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे .
याचा शुभारंभ ता. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या शुभहस्ते सायंकाळी सात वाजता होणार आहे .यावेळी तहसीलदार सागर ढवळे प्रमुख उपस्थित असणार आहेत .
दी. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या डायनॅमिक स्कूलच्या पाठीमागे बालभवन मैदानावर हे केंद्र उभारण्यात आले आहे .अत्यंत कमी कालावधीत या ठिकाणी दर्जेदार खेळपट्टी उभारण्यात आली असून याठिकाणी 5  ते 18 वयोगटातील मुला मुलींच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. अकॅडमीमध्ये खेळाबरोबरच अन्य बाबींची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन द्वारा प्रमाणित प्रशिक्षक श्री गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
         या माध्यमातून तालुक्यात दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षणाची सोय होत असून शुभारंभ कार्यक्रमासाठी क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Previous Post Next Post