ब्रेकिंग न्यूज

ग्रामीण भागातील खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळण्यासाठी क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी. मा. जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख.

 आटपाडी प्रतिनिधी 
सध्याच्या काळात सर्वात जास्त खेळला जाणारा क्रिकेट हा एकमेव खेळ आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना याबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन व दर्जेदार साधने मिळावीत या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली असल्याचे मत मा.जि.प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. 
श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उभारण्यात आलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीस या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या शुभहस्ते व तहसीलदार सागर ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी श्री देशमुख म्हणाले की सर्व सुविधा व तंत्रशुद्ध युक्त असलेल्या या प्रशिक्षण केंद्राचा पालकांनी आपल्या मुलांना लाभ द्यावा.
कार्यक्रमास माजी सभापती हर्षवर्धन देशमुख ,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ ,बीडीएस बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड ,माजी. जि. प .सदस्य अरुण बालटे, बाजार समितीचे माजी संचालक ऋषिकेश देशमुख ,माजी उपसभापती दादासाहेब मरगळे, सावंत पुसावळे, श्रीरंग आण्णा कदम, बाळासाहेब कारंडे, प्रकाश नामदास सर ए.के .गायकवाड सर, प्रशिक्षक गणेश चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले.

आटपाडी येथे श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार संजय काका पाटील, तहसीलदार सागर ढवळे, अमरसिंह देशमुख व मान्यवर.


Previous Post Next Post