आटपाडी प्रतिनिधी
कोलकत्ता येथे झालेल्या डॉक्टर महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन ने पुकारलेल्या संपामध्ये आज आटपाडी तालुका मेडिकल असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली.
या संपामध्ये तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.