आटपाडी प्रतिनिधी
सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या कर्तुत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात आले असून ता. 5 सप्टेंबर रोजी या लोकतीर्थ स्मारकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज आटपाडी येथे माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, डॉ. जितेश कदम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक करताना जयदीप भोसले म्हणाले की स्वर्गीय पतंगराव कदम व स्वर्गीय मोहन काका भोसले यांच्या जिव्हाळ्यातून आटपाडी तालुक्यांमध्ये एक ऋणानुबंध तयार झाला आहे .त्यामुळे ता. पाच रोजीच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे आटपाडी तालुक्यावर विशेष प्रेम होते या भागातील सिंचन ,शिक्षण यासह अनेक प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे ता.पाच रोजीच्या कार्यक्रमाला आटपाडीकरांची उपस्थिती मोलाची ठरेल.यावेळी खा. विशाल पाटील ,डॉ.जितेश कदम यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शिवाजी तात्या पाटील, रावसाहेब काका पाटील, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डी एम पाटील सर ,बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हणमंतराव देशमुख, सावित्री देवी उद्योग समूहाचे भारत तात्या पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे ,बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष गणपतराव काटकर, माजी प.स. सदस्या सारिका भिसे, अँड .विशालराव देशमुख, विठ्ठलराव ढोबळे सदाशिव ढगे, शिवाजीराव दबडे ,प्रदीप पाटील सर ,दत्तात्रय यमगर, उमर शेख, बाळासाहेब खाडे, आवटेवाडी सरपंच किरण पवार, अर्जुन कोळेकर, सचिन गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.