आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ हे ता. २७ पासून खरसुंडी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले होते.
आज दुपारी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील सहकारी अधिकारी श्रेणी१ श्री नामदेव लोखंडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यवाहीस्तव पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेखर निचळ यांनी आपले उपोषण पाठीमागे घेतले.
यावेळी योगेश पुजारी, सचिन गुरव, रोहित भांगे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, ऋषिकेश भिसे, रवी पुजारी, रफिक आतार, लक्ष्मण पुजारी, जिल्हा बँकेचे अधिकारी हुमायून शेख व सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी उपस्थित होते.