ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण

आटपाडी प्रतिनिधी 
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी काल ता. 27 पासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर निचळ यांनी  खरसुंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण कायम आहे.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांपुढे दुष्काळ महापूर अवकाळी अशा अनेक समस्या आहेत. त्याचबरोबर शेतीमालाला हमीभाव नसल्याने व खते, बियाणे औषधे यांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी  शेखर निचळ यांनी केली आहे. 
दरम्यान सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी यांचे वतीने शेखर निचळ यांची भेट घेऊन सदरचा प्रश्न राज्यस्तरावरील असल्याने वरिष्ठ कार्यालयास आपल्या मागणीबाबत अहवाल दिला आहे तरी उपोषण स्थगित करावे असे आवाहन केले आहे .मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने दुसऱ्या दिवशी निचळ यांचे उपोषण सुरू राहिले आहे.


Previous Post Next Post