आटपाडी प्रतिनिधी
विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांना सन 2023 / 24 चा उत्कृष्ट संसदपटु पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवार ता. 3 सप्टेंबर रोजी माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते विधान भवन मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये विधानपरिषदेत विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण भाषणांनी आपली छाप पाडली आहे. सभागृहात राज्यातील वर्तमान परिस्थितीतील ज्वलंत प्रश्न व समाजातील विविध वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कामकाजाची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आ.पडळकर यांचे याबद्दल विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.