ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता. आटपाडी येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी.आ. गोपीचंद पडळकर यांचे विशेष प्रयत्न .

आटपाडी प्रतिनिधी 
श्री क्षेत्र खरसुंडी ता. आटपाडी येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली अनेक वर्ष प्रलंबित होती त्यास  आज शासनाने मंजुरी बाबतचा आदेश काढल्याने यश मिळाले आहे. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते .त्यामुळे आटपाडी पश्चिम भागातील जनतेतून आ.पडळकर यांचे अभिनंदन होत आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की खरसुंडी हे राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी वर्षभरामध्ये दोन यात्रा व विविध उत्सवा दरम्यान सुमारे पंचवीस लाखांहून अधिक भाविक भेट देत असतात. त्याचबरोबर खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत नेलकरंजी ते  झरे ही सर्व गावे समाविष्ट असल्याने या ठिकाणी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत होता. तसेच पुढील उपचारासाठी नागरिकांना आटपाडी किंवा करंजे येथे जावे लागत होते. त्यामुळे खरसुंडी येथे ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती .
          याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने सादर केल्यानंतर आ. पडळकर यांनी या बाबीचा पाठपुरावा केला त्यानंतर आज शासनाने विशेष बाब म्हणून खरसुंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस  खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केल्या बाबतचे आदेश काढले आहेत.

आ.गोपीचंद पडळकर

Previous Post Next Post