ब्रेकिंग न्यूज

टेंभू योजनेचा सहावा टप्पा ही स्व. अनिल भाऊंची स्वप्नपूर्ती आहे त्यामुळे ता. २ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

आटपाडी प्रतिनिधी 
टेंभू योजनेचा सहावा टप्पा ही स्वर्गीय अनिल भाऊंची स्वप्नपूर्ती आहे त्यामुळे ता. दोन रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा. आगामी निवडणुकी माझ्या दृष्टीने गौण बाब आहे. मतदारसंघातील एकही गाव टेंभू पासून वंचित राहू नये हे स्वप्न भाऊंनी पाहिले होते व त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत या कामाच्या मंजुरीसाठी केलेली धडपड आपण  सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चात होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन जि.प .माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले. 
ता. 2 ऑक्टोंबर रोजी विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ व शेतकरी मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथे जाधव महाराज मठात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व अमोल बाबर प्रमुख उपस्थित होते .
यावेळी सुहास बाबर यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने सहाव्या टप्प्याची महत्त्व व अनिल भाऊंनी केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडला .
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील म्हणाली की भाऊंच्या पश्चात होणारा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. तो पूर्ण ताकतीने पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे .तालुक्यात प्रत्येक विभागानुसार ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे त्याच्याशी संपर्क साधून नियोजन करा व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे अवाहन त्यांनी यावेळी केले .
कार्यक्रमास आर.पी.आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, दत्तात्रय पाटील, अमोल मोरे, बाळासाहेब होनराव ,मनोज नांगरे ,सुबराव पाटील, साहेबराव चवरे,संतोष पुजारी, साहेबराव पाटील, सोमनाथ गायकवाड, विजय देवकर ,संजय यमगर, सत्यशील सवणे, गणेश खंदारे, दादासाहेब कुचेकर ,बजरंग लेंगरे पोपट गाढवे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आटपाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर.

Previous Post Next Post