ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी तालुका आटपाडी येथे नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग.ता.१२ रोजी विजयादशमी साखर वाटप ,ता.१३रोजी देव सीमोल्लंघन.

आटपाडी प्रतिनिधी
श्री क्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ नवरात्पारोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीने वेग घेतला आहे. नवरात्रोत्सवासाठी मुख्य मंदिरात स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर देवस्थानच्या लवाजम्यातील व नित्य वापरातील वस्तू, दागिने, कपडे यांचीही स्वच्छता करण्यात येणार आहे .संपूर्ण धुपआरती मार्गावर भाविकांच्या वतीने भव्य मंडप व विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 
नवरात्रोत्सवास ता. ३ रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार असून तदनंतर दररोज त्रिकाळ धुपारती, उत्सव मूर्तीची विविध रूपातील पूजा, जागर असे कार्यक्रम होणार आहेत. ता. 10 रोजी सिद्धनाथ मंदिर हरजागर तर ता.११ रोजी घट उत्थापन व  जोगेश्वर मंदिर हरजागर होणार असून पालखीचा मुक्काम जोगेश्वरी मंदिरात असणार आहे. ता.१२ रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटप सोहळा होणार असून ता. १३ रोजी चिंचाळे हद्दीतील देव सीमोल्लंघन सोहळा व नगरप्रदक्षिणा संपन्न होईल. 
नवरात्र उत्सवा दरम्यान श्रींच्या उत्सव मूर्तीची विविध रूपातील सालंकृत पूजा, वैशिष्ट्यपूर्ण फेरपूजा, नामवंत बॅड पथकांचे हजेरी ,व  सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

खरसुंडी ता.आटपाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्त धुपारती मार्गावर मंडप उभारणीचे काम गतीने सुरू आहे.

Previous Post Next Post