ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता. आटपाडी येथील सिद्धनाथ मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरूवात.

आटपाडी प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. आज सकाळी मंदिरामध्ये नित्योपचार झाल्यानंतर दुपारी बारा वाजता मंत्रोपचाराच्या गजरात मुख्य मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर श्रींचे  पुजारी व धुपारतीच्या लावाजम्यासह जोगेश्वरी मंदिर व अन्य ठिकाणी घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त आज पासून ता.१३ देवसिमोल्लंघना  पर्यंत मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे असणार आहे. त्याचबरोबर त्रिकाल धुपारती ,जागर, उत्सव मूर्तीची विविध रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रानिमित्त  धुपारती मार्गावर भाविकांच्या वतीने भव्य मंडप व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज दिवसभर घटस्थापने निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

  श्रीनाथ देवस्थान समितीच्या वतीने मंदिराच्या आवारात सुरू असणारी दगडी फरशीचे काम आज पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अध्यापि हे काम सुरू असल्याने भाविक व ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे.

घटस्थापने निमित्त मुख्य मंदिरात बांधण्यात आलेली सदरे वरील बैठी पुजा.

Previous Post Next Post