ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथे पारंपारिक व शाही थाटात देव सीमोल्लंघन संपन्न

आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे पारंपारिक व शाही थाटात देव सीमोल्लंघन संपन्न
रविवार ता १३ रोजी पांशाकुशा एकादशीनिमित्त देव सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाला. दुपारी दोन वाजता मुख्य मानकरी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे धुपआरती सह मुख्य मंदिरात आगमन झाले .यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .अडीच वाजता श्रींच्या पालखीने पारंपारिक व शाही थाटाच्या लवाजम्यासह मुख्य मंदिरातून चिंचाळे कडे प्रस्थान केले. मुख्य पेठ, येताळबा मंदिर मार्गे पालखी गतीने चिंचाळे येथील माळावर पोचली. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने श्रींचे स्वागत केले. यावेळी चिंचाळे ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली .त्याचबरोबर भाविकांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे वाटप केले. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी श्रींचे दर्शन घेऊन भाविकांना सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पालखीच्या दांडीला दोर बांधून पारंपारिक खेळाला सुरुवात झाली. दोराच्या मार्गात येणाऱ्या भाविकांना पाडले जात होते. तर दुसऱ्या बाजूला भाविक चांगभलं चा गजर करत होते. सायंकाळी पालखीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. गाव ओढ्या नजीक शस्त्र पूजन करण्यात आले. त्यानंतर नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली. ठीक ठिकाणी नागरिकांनी श्रींचे आकर्षक रांगोळी काढून स्वागत केले. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. पालखी सोबतच्या लवाजम्याला भाविकांनी प्रसादाचे वाटप केले. उत्तर रात्री एक वाजता पालखी मुख्य मंदिरात परतल्यानंतर नवरात्रोत्सवाची सांगता झाली .

चिंचाळे हद्दीत देव सीमोल्लंघना निमित्त पारंपारिक पद्धतीने दोराचा खेळ खेळताना भाविक.

चालू वर्षी नगरप्रदक्षिणेच्या वेळी पालखी समोर एकच बँड पथक असल्याने पालखी नियोजित वेळेपेक्षा दोन तास अगोदर मंदिरात पोचली याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
Previous Post Next Post