आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानला शासनाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी ब वर्ग दर्जा घोषित केला होता. त्याचबरोबर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सुमारे 18 कोटी 50 लाख खर्चाच्या आराखड्यास तत्वता मानण्यात देण्यात आली होती.
त्यानंतर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात रु ४.५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार या निधीच्या माध्यमातून भक्त निवास दोन कोटी, स्वच्छतागृह पन्नास लाख ,ध्यानमंदिर एक कोटी, बंदिस्त गटार एक कोटी ही कामे होणार आहेत .
खरसुंडी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाल्याने भाविक व ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.
या कामासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे ,आमदार गोपीचंद पडळकर ,ग्रामपंचायत व देवस्थान प्रशासनाने प्रयत्न केले.
खरसुंडी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा पहाण्यासाठी खालील लिंकवर जाऊन युट्यूबवर ओपन करा
https://youtu.be/c6tjyHEYGnk?si=2j87MIxvqj_dVZsK