ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथे श्रीनाथ जन्माष्टमी सोहळा संपन्न

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये श्रीनाथ जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
जन्माष्टमी निमित्त मुख्य मंदिरात ता. 16 पासून अखंड हरिनाम सप्ताह व भैरवनाथ महात्म्य ग्रंथाचे पारायणाचे आयोजन करण्यात आले होते .
श्रीनाथ  जन्माष्टमीनिमित्त मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती .तर श्रींची सदरे वरील बैठी पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळ नंतर जन्म सोहळ्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली. मंदिरासमोरील आवारात श्रींचा पाळणा बांधण्यात आला होता. त्या ठिकाणी ह. भ. प. चंद्रकांत गायकवाड शिरगावकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. उत्तर रात्री साडेबारा वाजता चांगभलं चा गजर करीत पुष्पवृष्टी करण्यात आली .सप्ताह निमित्त मंदिरात भजन ,कीर्तन ,अन्नदान ,हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
   उद्या तारीख 24 रोजी ग्रंथ मिरवणूक, दहीहंडी संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे संयोजन देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने करण्यात आली होते.
    उद्या तारीख 24 रोजी कुस्ती मैदान 
 सालाबादप्रमाणे जन्माष्टमी निमित्त होणारे कुस्ती मैदान ता. 24 रविवारी दुपारी होणार आहे.

खरसुंडी ता.आटपाडी येथील सिद्धनाथ मंदिरात नाथाष्टमी निमित्त भाविकांची गर्दी.

Previous Post Next Post