आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात तब्बल 57 गावात शिवसेनेचे सुहास बाबर यांनी आघाडी घेतली आहे. वैभव पाटील यांनी दोन गावात तर राजेंद्र अण्णा देशमुख यांना केवळ एका गावात आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात तानाजीराव पाटील हेच किंगमेकर असल्याचे सिद्ध झाले आहे.
नुकतीच झालेली विधानसभा निवडणुक अत्यंत चुरशीची व अटातटीची झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने या निवडणुकीत पाच ते दहा हजारांचे बहुमत मिळेल अशी चर्चा होती. मात्र या सर्व चर्चा व अंदाज फोल ठरवत. शिवसेनेच्या सुहास बाबर यांनी तब्बल 57 गावांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचा आटपाडी तालुक्यात करिष्मा कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीला तानाजी पाटील यांनी तालुक्यांमध्ये विकास कामांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क केला होता. तसेच विविध गटाचे व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे तालुक्यातील 57 गावांमध्ये सुहास बाबर यांना पुढील प्रमाणे मताधिक्य मिळाले आहे .
विभूतवाडी 346 ,पिंपरी बुद्रुक 427 ,पडळकरवाडी 270 , घरनिंकी 925 ,वलवण 777, चिंचाळे 565, खरसुंडी 467, आवटेवाडी 204, घुलेवाडी कानकात्रेवाडी 257 ,नेलकरंजी 961, मानेवाडी 137, घाणंद 349, जांभुळणी 417, पारेकरवाडी 480, कुरुंदवाडी 5 ,झरे 204 ,वाक्षेवाडी 115, कामथ 73, मिटकी 120, बाळेवाडी 487, गोमेवाडी 1190, हिवतड 415 ,काळेवाडी 285, करगणी 2221 ,बनपुरी 456, मुढेवाडी 47 ,निंबवडे 299, पळसखेल 69, लिंगीवरे 616 ,राजेवाडी 490, दिघंची 1370, आवळाई 332, पिसेवाडी 334, गळवेवाडी 318, तडवळे 285, माळेवाडी 178, तळेवाडी 304 ,पात्रेवाडी 33, शेटफळे 1462, भिंगेवाडी 192, मापटेमळा 379, पुजारवाडी दि.740,उंबरगाव 318, विठलापूर 895 ,शेरेवाडी 105, आटपाडी 1377, शेंडगेवाडी 70, मासाळवाडी 213, लेंगरेवाडी 229 ,पुजारवाडी 957, कौठुळी 862, पिंपरी खुर्द 733, आंबेवाडी 205,बोंबेवाडी ६६, खांजोडवाडी 229 ,य.पा.वाडी 663 ,माडगूळे 750 .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अँड .वैभव पाटील यांनीही आटपाडी तालुक्यात प्रचंड तयारी केली होती. मात्र त्यांना गळवेवाडी मध्ये 30 तर धावडवाडी मध्ये 127 मतांचे मताधिक्य मिळाले आहे .त्यामुळे महाविकास आघाडीचा करिष्मा आटपाडी तालुक्यात चालला नसल्याचे व बहुचर्चित" सांगावा "यशस्वी झाला नसल्याचे चित्र आहे. आटपाडी तालुक्याची अस्मिता म्हणून अपक्ष अर्ज दाखल केलेले माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी तालुक्यात मोठी प्रचार यंत्रणा राबवली होती मात्र त्यास मतदारसंघांमध्ये कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. परिणामी त्यांची अनामत जप्त झाली आहे. तालुक्यामध्ये केवळ देशमुख वाडी या गावात त्यांना 179 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे तालुक्याची अस्मिता हा मुद्दा मतदारांना आकर्षित करू शकला नाही.
तालुक्यामध्ये ही निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर झाली असली तरी टेंभूचा सहावा टप्पा, स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून झालेली विकास कामे ,लाडकी बहीण योजना व तानाजीराव पाटलांची निवडणूक पद्धती यामुळे शिवसेनेला यश मिळाले आहे. याचे अनुकूल परिणाम आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत पाहण्यास मिळतील.