आटपाडी प्रतिनिधी
खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सुहास बाबर विक्रमी मतांनी विजयी झाले. या विजया मध्ये ई.व्ही.एम .मशीन मध्ये झालेल्या फेरफारीचा संशय व्यक्त करीत आज विटा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील ,माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे संग्राम माने, प्रहार चे भक्तराज तिकडे, यांच्यासह अपक्ष उमेदवार सहभागी झाली होते.
या मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांसह , महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा मध्ये ई.व्ही.एम .हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नेत्यांनी विधानसभा निकालाच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत भविष्यात मतपत्रिकेच्या स्वरूपात निवडणुका घेण्याची मागणी केली . तसेच झालेल्या घोटाळ्या बाबत एकसंघ लढा देण्याची घोषणा केली.
ई.व्ही.एम. मशीन बाबत असे प्रकार घडत असतील तर भविष्यकाळात लोकशाही शिल्लक राहणार नाही. किंबहुना चांगल्या लोकांना राजकारणाबाबत विचार करावा लागेल.
अँड. वैभव पाटील
उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट.
ईव्हीएम मशीन मधील घोटाळ्यामुळे अपक्ष उमेदवारांची 40% पुढील मते विजयी उमेदवाराकडे वळवली गेली आहेत. त्यामुळे सर्व अपक्ष एकत्र येऊन या प्रकाराबाबत लढा देऊ.
मा. आमदार राजेंद्र आण्ण देशमुख.
(अपक्ष उमेदवार)
ई.व्ही.एम. बाबत लोकांच्या मनात साशंकता आहे .त्यामुळे बॅलेट पेपर पुन्हा निवडणूक घ्या त्यामध्ये आताचे विजयी उमेदवार 78000 मतांनी निवडून आले तर मी राजकीय संन्यास घेईन .
संग्राम माने
उमेदवार वंचित बहुजन आघाडी
उमेदवारांच्या गावात त्यांच्या घरातील मते ही त्यांना पडली नाहीत त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक बॅलेट पेपरवर आणण्यासाठी लढा चालु ठेवू.
भक्तराज ठिगळे.उमेदवार.