खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी तालुका आटपाडी येथील सरस्वती लक्ष्मण पुजारी सावकार वय ७२ यांचे अल्प आजाराने काल निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जुन्या पिढीतील नामवंत पैलवान स्वर्गीय लक्ष्मण सावकार यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी विजयकुमार पुजारी व खरसुंडीच्या माजी सरपंच सौ अंजली गुरव यांच्या त्या मातोश्री होत्या. रक्षाविसर्जन गुरुवार ता. २ रोजी सकाळी आठ वाजता खरसुंडी येथे होणार आहे.