ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथे दलित वस्तीतील कामांसाठी उपोषण,प्रत्यक्ष कामाचा शुभारंभा नंतर उपोषण स्थगित.

खरसुंडी प्रतिनिधी

खरसुंडी ता.आटपाडी येथील प्रभाग क्रमांक चार मधील रस्ते व गटारीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शहाजी भिसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण कामाला सुरुवात झाले नंतर स्थगित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की खरसुंडी येथे वार्ड क्र.४ दलित वस्ती मध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत.त्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी करूनही विकास कामे रखडली असल्याने शहाजी भिसे यांनी आज सकाळपासून उपोषणास सुरुवात केली. यावेळी त्यांना विविध स्तरातील मान्यवर व नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी मागणी केलेल्या कामांमध्ये वसंत भिसे ते सुमन भिसे घर रस्ता, दगडू भिसे ते श्रीरंग भिसे घर बंदिस्त गटार, विक्रम भिसे ते पांडुरंग भिसे घर रस्ता, अमोल केंगार ते दादा भिसे घर बंदिस्त गटार, राजाराम केंगार ते दादा भिसे बंदिस्त गटार ,लांडगे गुरुजी ते बाळू भिसे घर रस्ता अशा कामांचा समावेश होता.

आज सायंकाळी ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर सरपंच धोंडीराम इंगवले यांचे हस्ते प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अन्य कामाबाबत लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

Previous Post Next Post