आटपाडी प्रतिनिधी.
गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी गुरु गादी कोळे मठाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे उद्या ता.४ रोजी प्रस्थान होणार आहे.
रुद्र पशुपती कोळे मठाचे समाधीस्थ ३० वे मठाधिपती यांच्या गुरुतत्त्वाखाली सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्याचे हे 33 वे वर्ष आहे.
शुक्रवार ता.४ एप्रिल रोजी सकाळी मुख्यमठ कोळे येथून दिंडीचा प्रारंभ होणार असून रात्री आटपाडी मठात मुक्काम होणार आहे .त्यानंतर शनिवार ता. ५ रोजी दिघंची मार्गे राजेवाडी येथे मुक्काम होणार आहे. रविवार ता. ६ रोजी म्हसवड मार्गे मार्डी येथे मुक्काम होणार असून सोमवार ता.७ रोजी दिंडी शिखर शिंगणापूर येथे मुक्कामास असणार आहे. ता.८ रोजी कीर्तन सोहळा असून ता. ९ रोजी परमह्रस्य ग्रंथाचे पारायण समाप्ती ,महाप्रसाद, आशीर्वाचन ,धर्मसभा आदी कार्यक्रम होणार आहेत. या दिंडीमध्ये मठाचे ३१ वे मठाधिपती व श्री महादेव महाराज हिंगणगाव हे सहभागी होणार आहेत.
दिंडी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी स्वागताची तयारी केली आहे.