ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेनिमित्त खिलार जनावरांचा बाजार घाणंद रोडवरच भरवण्याचा प्रांताधिकारी यांच्या बैठकीत निर्णय ,

 खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेनिमित्त  खिलार जनावरांचा बाजार  घाणंद रोडवरच भरवण्याचा प्रांताधिकारी यांच्या बैठकीत निर्णय ,

खरसुंडी प्रतिनिधी 

खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेच्या निमित्ताने भरणारा जातीवंत खिलार जनावरांचा बाजार महाराष्ट्र , कर्नाटक व आंध्रप्रदेश प्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. जुने यात्रा तळ  संपुष्ठात आल्याने व गावाचे नागरी वस्तीत वाढ झाली असल्याने यात्रातळाची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पौष यात्रा भिवघाट रस्त्यावर वीज  मंडळाचे परिसरात तर चैत्र यात्रा ‍‍‌ घाणंद रोडवर भरवली जात आहे. 

सालाबाद प्रमाणे  यावर्षी  ता. २३ पासून चैत्र  यात्रेनिमित्त खिलार जनावरांचा बाजार भरणार आहे. गतवर्षी प्रमाणे शेतकरयांनी घाणंद रोडवर जनावरांसाठी गेल्या महिन्या पासून जागा निश्चित केल्या आहेत . मात्र गेल्या काही  दिवसात ही यात्रा नेलकरंजी रोडवर भरवण्यात यावी अशी खरसुंडीतील काही नागरीकांनी मागणी केली होती . त्यामुळे समाजमाध्यम व वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे यात्रेबाबत शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होत होता.

आज प्राधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनावरांच्या बाजाराबाबत आढावा घेण्यात आला . यावेळी बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी यात्रातळावर देण्यात येणाऱ्या वीज ,पाणी ,आरोग्य या सुविधां बाबत माहिती देवून बाजार  घाणंद रोडवरच भरणार असल्याचे सांगितले . यावेळी सभापती संतोष पुजारी यांनी यात्रातळावर ग्रामपंचायत कडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली .यावेळी विलास नाना शिंदे यांनी घाणंद रोडवरील बाजारात पिण्याचे पाणी व अन्य सुविधा पुरवणार असल्याचे सांगितले .

शेकडो वर्षांची परंपरा व तिन्ही राज्यात प्रसिद्ध असणारा खरसुंडी 

येथील जनवारांचा बाजार टिकवून ठेवण्यासाठी बाजार समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून कायम स्वरूपी बाजारतळ अधिग्रहण करण्याची आवशक्ता व्यक्त होत आहे. 



Previous Post Next Post