खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथे चैत्र यात्रेमध्ये उद्या ता. २१ रोजी नाथष्टमी निमित्त श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित् जोगेश्वरी मंदिर परिसरात मोठी तयारी करण्यात आली आहे. नाथष्टमी निमित्त परंपरेनुसार ग्रामस्थांकडून पुरणपोळीचा नैवध्य अर्पण करण्यात येणार आहे.
विवाह सोहळयासाठी सांयकाळी चार वाजता श्रींचे मुख्य मंदिरातून पालखीसह प्रस्थान होणार आहे. त्यानंतर गोरज मुहूर्तावर जोगेश्वरी मंदिराजवळ हा विवाह सोहळा मेटकरी मानकरी ,ग्रामस्थ व सेवेकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानंतर बगाडाची ग्रामप्रदक्षणा होवून विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे.
विवाह सोहळ्यासाठी जोगेश्वरी मंदिरा जवळ भव्य मंडप उभारण्यात आला असून त्याठिकाणी भाविकांच्या वतीने दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.