ब्रेकिंग न्यूज

भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी सज्ज उद्या सासणकाठी व पालखी सोहळा

खरसुंडी प्रतिनिधी 
भाविकांच्या स्वागतासाठी नाथ नगरी खरसुंडी सज्ज.
उद्या ता. 25 रोजी होणाऱ्या सासनकाठी व पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी सज्ज झाली आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन बारी, पिण्याचे पाणी, स्वयंसेवक, सीसीटीव्ही या सुविधा सज्ज केल्या असून आज अहोरात्र मंदिर दर्शनासाठी सुरू राहणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने यात्रेतील व्यापाऱ्यांना जागा वाटप, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही ,पार्किंग, आरोग्य, स्वच्छतागृहे या सुविधा देण्यात आल्या आहेत .यात्रा कालावधीत शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्या माध्यमातून पालखी सोहळा व गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा  अन्वेषण विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. गावातील पाच  प्रमुख मार्गावर आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी केली असून ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा केली आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यावर उधळण्यात येणाऱ्या खोबऱ्याच्या वाट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून तुकडे करून उधळण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथके तैनात केली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्कालीन सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. यात्रेच्या अनुषंगाने भरलेल्या जनावराच्या बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वीज ,पाणी या सुविधा देण्यात आल्या  आहेत. पशुवैद्यकीय मार्फत जनावरांसाठी आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. परंपरेनुसार काल दशमीला मध्यरात्री देवाची मानाच्या  लोखंडी सासणकाठ्या  विठ्ठलापूरचे बाड व धावडवाडी च्या  मुस्लिम बांधवांनी स्नानासाठी घोडेखुर येथे रवाना केली आहेत .आज पहाटे ती जोगेश्वरी मंदिरात परत आले आहेत .यात्रेमध्ये फिरते व्यापारी, नवस  साहित्य, रसवंतीगृह ,मेवा मिठाई दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहेत.
 भाविकांना आता उद्या तारीख 25 रोजी होणाऱ्या सासणकाठी व पालखी  सोहळ्याची ओढ लागली आहे.
सासणकाठी सोहळ्यासाठी देवाच्या लोखंडी सासणकाठ्या दाखल.
Previous Post Next Post