ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ चैत्र यात्रेस हळदी समारंभाने सुरवात , ता. २५ एप्रिल रोजी सासणकाठी व पालखी सोहळा, यात्रेचा मुख्य दिवस .

 

आटपाडी प्रतिनिधी

माणदेशाचे आराध्य दैवत व महाराष्ट्र , कर्नाटक व आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध असणारया खरसुंडी येथील चैत्र यात्रेस रामनवमी दिवशी हळदी समारंभाने प्रारंभ झाला आहे. सोमवार ता. २१ रोजी नाथष्टमी निमित्त श्री नाथ जोगेश्वरी विवाह सोहळा होणार आहे. शुक्रवार ता. २५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सासणकाठी व पालखी सोहळा होणार आहे.शनिवार ता. २६ रोजी रथोत्सव होणार आहे.

रामनवमीच्या मुहूर्तावर रात्री मुख्य मंदिरात चिंचाळे येथील गायकवाड मानकरी यांच्या उपस्थिती मध्ये श्रींना हळद लावण्यात आली आहे. त्यापूर्वी सकाळी जोगेश्वरी व मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर तोरण बांधण्यात आले. परंपरेनुसार हळदी समारंभा नंतर मंदिरात श्रीफळ न फोडता वाहण्यास सुरवात झाली आहे.

सोमवार ता.२१ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गोरज मुहूर्तावर जोगेश्वरी मंदिरा जवळ श्री नाथ जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समिती व ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या वतीने विविध पातळीवर तयारी सुरु आहे.


खरसुंडी ता.आटपाडी येथे हळदी समारंभा निमित्त बांधण्यात आलेली पूजा .

                        यात्रेबाबत उद्या आढावा बैठक.

यात्रेच्या अनुशंगाने विविध शासकीय यंत्रणा व मानकरी ,सेवेकरी यांची नियोजना बाबत आठावा बैठक तहसीलदार सागर ढवळे यांनी गुरुवार ता.१० रोजी दुपारी चार वाजता देवस्थान सभागृहात आयोजित केली आहे. सदरच्या बैठकीत सालाबाद प्रमाणे चर्चा न होता . मांढरदेवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर न्या.काचोर आयोगाने सुचवलेल्या उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित आहे .

Previous Post Next Post